Coronavirus | महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार!
महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज (25 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात येईल. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतणार आहे.