Pune Housing Society | जाचक अटी लादणाऱ्या पुण्यातील हाऊसिंग सोसायट्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
कोरोना संकटाच्या काळात जाचक नियम आणि अटी करणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांच्या मनमानीला चाप बसण्याची शक्यता आहे. मनमानी करणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील, असं पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं. तर अशा सोसायट्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं आहे.