Elgar Parishad at Pune | पुण्यात आज एल्गार परिषदेचं आयोजन
पुण्यात आज गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरला ही परिषद घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिषदेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. साध्या वेशातील पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या एल्गार परिषदेसाठी मोठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.