Pune: नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न ABP Majha
पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव समोर आलाय. नवले पुल आणि त्यापासून काही अंतरावर असलेला वडगाव पुल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आलाय. या ठिकाणी अपघातांमधे सतत होणारी जिवितहानी लक्षात घेता या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.
Tags :
Accident Pune Municipal Corporation New Bridge New Proposal Wadgaon Bridge To National Highways Authority