
Pune Drugs Case : गेल्या 2 दिवसात 650 किलो वजनाचे 1100 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त
Continues below advertisement
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या २ दिवसात ६५० किलो वजनाचे ११०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. पुणे शहरातील एका गोदामातून तसचं कुरकुंभ एमआयडीसी मध्ये असलेल्या एका कारखान्यातून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक झालीये. कुरकुंभ एमआयडीसीमधील अनिल साबळे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या एका कारखान्यात हे ड्रग्ज तयार केले जायचे, आणि त्यानंतर परदेशात पाठवले जायचे. म्हणजेच, हा सगळा बेकायदा उद्योग एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग होता, हे पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.
Continues below advertisement