Pune Drugs Case : मेफेड्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोड वर्ड्स उघड, 7 जणांना कोर्टात हजर करणार
Pune Drugs Case : मेफेड्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोड वर्ड्स उघड, गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात यश
पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचं पवित्र आंगण असं काहीसं वर्णन आपण करतो. मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळू लागल्याचं चित्र आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात. मात्र या शैक्षणिक नगरीतला आता ड्रग्जच्या धुराचा ठसका लागलाय आणि ते समोर आलंय झालेल्या मोठ्या कारवाईतून. एक नाही, दोन नाही तर आतापर्यंत तब्बल चार हजार कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्याला नशेच्या खाईत कोण ढकलतंय? पुण्याच्या गळ्याभोवती ड्रग्जचा विळखा कोण आवळतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.