Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोपी Lalit Patil चे Sassoon Hospital मधून पलायन
Continues below advertisement
पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करीप्रकरणातील आरोपी ललित पाटीलनं पलायन केलंय.. ससून रुग्णालयाच्या गेटवर रविवारी २ कोटींचे ड्रग्ज सापडले होते... याच प्रकरणातील आरोपीवर रुग्णालयात उपाचारही सुरु होते.. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलं होतं. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती.. मात्र काल पोलीसांच्या ताब्यात असलेला आरोपी ललित पाटील फरार झाला. त्याचा शोध सध्या सुरु असला तरी पोलिसांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. तसंच हा आरोपी ससून रुग्णालयात हे रॅकेट चालवत होता तरी कसा? याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतायत. याच ससून रुग्णालयाबाहेरुन आढावा घएतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी.
Continues below advertisement