ABP News

Pune Dog Attack : चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला , हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

Continues below advertisement

पुणे: पुण्यातील चाकण परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चाकणजवळील कडाचीवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी कुत्र्यांच्या टोळीने (Dogs Attack) लहान मुलाला घेरुन तिच्यावर हल्ला केला. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळच असताना कुत्र्यांच्या टोळक्यांनी चिमुकल्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडुन त्याचे लचके तोडण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीही हैदोस घातला कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने चिंतेची बाब असुन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram