Ajit Pawar Reviews Pune Metro Work | अजित पवारांकडून सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार पाहणी करण्यासाठी पहाटे सहा वाजताच पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथील कार्यालयात दाखल झाले. अजित पवार येणार म्हटल्यावर भल्या पहाटेच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी करुन ठेवली होती. अजित पवारांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. यावेळी पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल याचाही अनुभव घेतला. इतकंच नव्हे तर मेट्रोच्या रुळावर जाऊन काही अंतर प्रवासही केला. शिवाय लॉकडाऊनमुळे पुणे महामेट्रोच्या कामात दिरंगाई आलीय का? कामगार पोहोचलाय का? यासह अन्य माहिती त्यांनी घेतली.