Pune : पुण्यात मृत गुंडाचा वाढदिवस साजरा करताना धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल | ABP Majha
गुंड भावेश कांबळे याचा काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाला होता. 7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरासमोर 10 ते 15 जण एकत्र जमले होते. यासर्वानी भावेश कांबळे याच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. काहींनी तर हवेत कोयते आणि गावठी पिस्तुल नाचवत त्याच्या नावाचा जयघोष केला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.