Dagdusheth Ganpati अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला फळांची आरास, मात्र दर्शनासाठी मंदिर बंद
Continues below advertisement
विनायक चतुर्थी आणि अंगारकीचा योग असल्याने आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला फळांची आरास करण्यात आली. बाप्पाला आकर्षक फुलांनी सजवण्यातही आलं. विविध अकरा प्रकारच्या फळांची आरास केल्यानं बाप्पाचं रूप अधिक आकर्षक होतं. कोरोनामुळे सध्या दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय, मात्र आज विनायकी चतुर्थी असल्याने मंदिरात गणेशयाग आणि नेहमीची पूजा अर्चा करण्यात आली.
Continues below advertisement