Pune Dagdusheth Ganpati : 5 हजार शहाळ्यांचा 'बाप्पा'ला महानैवेद्य ABP Majha
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात बाप्पाला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीचं औचित्य साधत दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता यावेळी साकडं घालण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.
Tags :
Pune Dagdusheth Ganpati Coconut Pune Dagdusheth Ganpati Pushtipati Vinayak Jayanti 2022 Vinayak Jayanti 2022