निष्क्रीय बँक खात्यातील कोट्यवधींचा डेटा विक्रीचा डाव पुणे सायबर पोलिसांनी उधळला
वर्षानुवर्षे कोणताही व्यवहार होत नसलेल्या निष्क्रीय बॅंक खात्यांची माहिती चोरुन त्या आधारे ऑनलाईन दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलीसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या आठ आरोपींमधे प्रसिद्ध मराठी अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकनीचा समावेश आहे.