Pune Dehu-Alandi : देहू-आळंदीत 28 जून ते 4 जुलै दरम्यान संचारबंदी लागू
Continues below advertisement
पुण्यातील देहू-आळंदीत आजपासून वारकऱ्यांना प्रवेश बंदी आहे. कोरोनाची तिसरी लाट तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने 28 जून ते 4 जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैला संत तुकोबांच्या तर 2 जुलैला संत ज्ञानोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पण पालखी सोहळा हा मंदिरातच मुक्कामी असेल तर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी एसटीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. त्यामुळे देहू-आळंदीत वारकरी दर्शनाला येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरुनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Continues below advertisement