Pune : नूमवी शाळेत विद्यार्थ्यावर कोयत्याचे वार, 2 अल्पवयीन मुलांच्या भांडणात विद्यार्थी जखमी

Continues below advertisement

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता  बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 17  वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी हल्ला  केला आहे. समीर पठाण आणि विजय आरडे अशी या 17 वर्षीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. समीर पठाण याच्या मैत्रिणीशी विजय बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग पठाणला आला आणि त्याने विजयवर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेल्या  विद्यार्थ्याला देखील जखमी झाला. वार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram