Pune Crime : पुण्याच्या तळेगावात अज्ञातांकडून दहशत पसरवण्यासाठी गोळीबार
Pune Crime : पुण्याच्या तळेगावात अज्ञातांकडून दहशत पसरवण्यासाठी गोळीबार
पुण्याला हल्ली काय झालंय तेच कळायला मार्ग नाही.. कधी हिट अँड रन, कधी राडे, कधी कोयता गँगचा हल्ला, कधी वाहनांची तोडफोड.. आज तळेगावात एक अजब घटना घडलीये. तळेगावमध्ये अज्ञात लोकांनी ३ ते ४ ठिकाणी हवेत गोळीबार केला. दहशत पसरवण्यासाठी गोळीबार हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज रात्री ९च्य़ा सुमाराला हा गोळीबार करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.