Pune Crime : पुण्यातील शिरगावच्या सरपंचांवर जमिनीच्या वादातून हल्ला, सरपंचाचा मृत्यू
Pune Crime : साईबाबांचं प्रतिशिर्डी असलेल्या पुण्यातील शिरगावच्या सरपंचांवर धारधार शस्त्रांनी हल्ला झालाय. या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झालाय. प्रवीण गोपाळे असं या मृत सरपंचाचं नाव आहे.. या हल्ल्यानंतर गोपाळे हे मृतावस्थेत पडले.. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराअंतीच या सरपंचाचा मृत्यू झाला. या हल्ल्याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.. मात्र जमिनीच्या वादावरुन ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सध्या या हल्लेखोरांचा तपास पोलीस करतायत.