Pune Crime : पुण्यातील COEP कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार,विद्यार्थिनींचे चोरुन काढले फोटो
Pune Crime :
पुणे : पुण्यातील सीओईपीच्या वसतिगृहातील एका (Pune Crime News) विद्यार्थिनीने आपल्या रूमपार्टनरचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ बनवून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा (Boyfriend) प्रकार समोर आला आहे. हे व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतरही व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न केल्याने या विद्यार्थ्यांना मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. सगळा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा या दोन जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आणि विनीत हे दोघे ही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चे चोरून व्हिडिओ फोटो काढून तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे कृत्य त्यांनी का केले याचा तपास पोलीस करत आहेत.