Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक 11 हजार कोरोना बाधितांची नोंद
पुण्याच 14 जुलेपासून लॉकडाऊन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार 10 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. पुण्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. परंतु, लॉकडाऊनच्या काळातच पुण्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. पुण्यात काल दिवसभरात 2459 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 61 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता, ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.