Pune Congress : पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटावरून वादावादी

Continues below advertisement

Pune Congress : पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटावरून वादावादी 

महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे (Thackeray Faction) गटामध्ये होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा अक्षरशः ठप्प झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याने जागावाटपाची चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. दरम्यान, जागा वाटपामध्ये आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात उद्या मुंबईमध्ये येणार आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत यादी सुद्धा काँग्रेसकडून प्रसिद्ध केली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.   अनेक नावांवरती काँग्रेसकडून शिक्कामोर्तब आता बाळासाहेब थोरात यांच्या एन्ट्रीनंतर तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा घोळ संपतो का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान आजच्या बैठकीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, आजची बैठक व्यवस्थित पार पडली. अनेक नावांवरती काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये काँग्रेसची यादी जाहीर होईल. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकारी समितीची पुन्हा एक बैठक होणार असून त्यानंतर बाकीची नावं अंतिम केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram