Pune Chipko Andolan For Trees : नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्यास नागरिकांचा विरोध, आज चिपको आंदोलन

Pune Chipko Andolan For Trees : नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्यास नागरिकांचा विरोध, आज चिपको आंदोलन

पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत.  पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी  ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार असून सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनदरम्यान करण्यात येणार असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सर्व आंदोलनकर्ते मिठी मारणार आहेत. झाडं वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola