Pune: अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाला संपवलं, घाटात फेकलं ABP Majha
चुलत भावाशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्मलेलं बाळ, पुण्यातल्या ताम्हिणी घाटात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.. बाळाला फेकणाऱ्या आरोपीचे, त्याच्या विधवा चुलत बहिणीसोबत शारिरीक संबंध होते.. या संबंधातून जन्माला आलेलं बाळ कुटुंबियांना मान्य नव्हतं. ५ फेब्रुवारीला रत्नागिरीला जाण्याच्या बहण्यानं आरोपी आणि त्याचे भाऊ हे बाळ आणि आईसह एका वाहनातून निघाले. ताम्हिणी घाट येताच आरोपीनं बाळाला आईच्या हातातून खेचलं आणि त्याला दरीत फेकून दिलं. बाळाच्या आईनं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर बाळाचा शोध सुरु करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे..
Tags :
Pune Ratnagiri Accused Immoral Relationship Physical Relationship Child Born In Tamhini Ghat Widow Cousin