Pune Chandni Chowk Flyover : पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडणार; मुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी
पुण्याच्या चांदणी चौकातील पूल लवकरच जमीनदोस्त होणार आहे. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे.. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय.. पाडकाम करण्यापूर्वी वाहतुकीत करण्यात येणारे बदल कळवण्यात येतील. दरम्यान २६ तारखेला चांदणी चौकातील ट्रॅफिक जॅममुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा खोळंबा झाला होता. त्यानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.. दरम्यान साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना मुख्यमंत्री चांदणी चौकात थांबून अधिकाऱ्यांशी या प्रश्नावर चर्चा केली. चांदणी चौकातील पुलाची पाहणी केली.