Pune मधील चांदणी चौकातला पूल २ ऑक्टोबरला पाडला जाणार, नवा Bridge बांधण्याचा निर्णय : ABP Majha
पुण्यातील वाहतुकीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातला पूल पाडण्याची वेळ अखेर ठरलीय. हा पूल अखेर २ ऑक्टोबरला पाडला जाणार आहे. पूल पाडल्यानंतर कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचं काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढाकार घेतला आणि हा पूल पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय.... त्यानंतर आता २ ऑक्टोबरला पूल पाडण्यात येणार आहे....