Pune Chandani Chowk Bridge Demolition : 1 ऑक्टोबरला चांदणी चौकातील पूल पाडणार, तयारी सुरु
Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील चांदणी चौकातील पुल एक ऑक्टोबरच्या मध्यरात्री स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतीमधे ड्रीलींग करून तेराशे छिद्रं करण्यात येतायत. या छिद्रांमधे भरलेल्या स्फोटकांचे काही मिली सेकंद अंतराने अनेक स्फोट करून हा पुल पाडण्यात येणार आहे.