Pune Nikhil wagle : निर्भय बनो कार्यक्रमादरम्यान गदारोळ; निखिल वागळे, आयोजकांवर गुन्हे दाखल

पुणे : पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला. या प्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह (dhiraj ghate) 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल (FIR) झाल्यानंतर आता निर्भय बनो (Nirbhay Bano) या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारीला राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी निखिल वागळे (Nikhil Wagle) येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला केला. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola