Pune Car Accident : कंटेनर अनियंत्रित झालं अन् कारला दूरवर फरफटत नेलं, थरकात उडवणारा अपघात

पुणे-अहमदनगर रोडवरील शिक्रापुरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे.. एका भरधाव कंटेनरने एका कारला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या कारमध्ये चार जण प्रवासी होते. सुदैवाने हे चारही प्रवासी या अपघातातून बचावले आहेत. यापैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. कंटेनरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola