Pune Car Accident Case Update : नार्को टेस्टवरुन पेटलं राजकारण, नेते मंडळी भिडले

Continues below advertisement

Pune Car Accident Case Update : नार्को टेस्टवरुन पेटलं राजकारण, नेते मंडळी भिडले

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे..अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदल्याचं समोर आलं.. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉ. अजय तावरे यांनी एक प्लॅन आखला होता..अल्पवयीन मुलाशी मिळते जुळते ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे ब्लड सॅम्पल ससूनमध्ये तपासणीसाठी दिल्याचं तपासात समोर आलं..दरम्यान आज पार पडलेल्या सुनावणीत ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीये. डॉ. अजय तावरे, श्रीहरी  हळनोर, अतुल घटकांबळेंना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीये...तर अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आलेत..ती महिला त्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल आहे की आणखी कोणी याचाही तपास पुणे पोलिस करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram