Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
पुणे: कल्याणीनगरातील पोर्शे कार अपघातात, बिल्डरपुत्रानेअपघातानंतर संतापजनक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. दोन तरुणांचा जीव घेतल्यानंतर, विधीसंघर्ष मुलाला अटक केल्यानंतर काही तासातच जामीन मिळाला होता. हा जामीन मिळाल्यानंतर या तरुणाने चक्क रॅप साँग तयार केलं आणि शिवीगाळ करणारं रॅप साँगचा सेल्फी व्हिडीओ स्वत: शूट केला. या रॅप साँगमध्ये प्रचंड शिवीगाळ तर आहेच, पण चीड, संताप, येईल असे शब्द त्याने उच्चारले आहेत. विशाल अग्रवाल यांच्या या मुलाच्या कृत्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडीओ खरा आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. व्हिडीओ डीप फेक आहे का? याचीही सायबर विभाग चौकशी करत आहे. दुसरीकडे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाने मात्र व्हिडीओ आरोपीचा नसल्याचं म्हटलं आहे.
काय आहे रॅप साँगमध्ये?
मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,
चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++
करके बैठा मै नशे...
इन माय पोर्शे
सामने आया कपल मेरे
अब वो है निचे
साऊंड सो क्लिंचे
सॉरी गाडी चढ आप पे
१७ साल की उमर
पैसे मेरे बाप पे
1 दिन में मिल गयी मुझे बेल
फीर से दिखा दुंगा सडक पे खेल
प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार