Butterfly Garden | पुण्यातील प्राध्यापकाची गच्चीवर फुलपाखरांची बाग,डॉ.अंकुर पटवर्धन यांच्याशी बातचीत
पुण्यातील गरवारे काॅलेजमध्ये जैवविविधता विभागाचे प्रमुख असलेले डाॅ अंकुर पटवर्धन यांनी त्यांच्या घरातल्याच गच्चीवर एक सुंदर बाग फुलवली आहे. ही साधी सुधी बाग नसून ही फुलपाखरांची बाग आहे. फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी घरातल्या घरातच ही बाग फुलवली आहे. त्यांच्या या बागेत विविध जातींच्य विविध रंगांचे फुलपाखरं दिसतात. फुलपाखरांना आवडणाऱ्या फुलांची लागवड डाॅ अंकुर पटवर्धन यांनी आवर्जून केली आहे. कोणत्या फुलांकडे फुलपाखरे आकर्षित होतात? कोणत्या फुलांवर ते किती वेळ बसतात? असा सगळ्या बारकाव्यांचा अभ्यास या बागेत चालतो. या संशोधनामधून फुलपाखरांना आकर्षित करणारा परफ्यूम बनवण्याचा उद्देश असल्याचंही अंकूर पटवर्धन यांनी सांगितलं.