Pune Boy: अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चिमुरडा अखेर सापडला ABP Majha
गेल्या अनेक दिवसांपासून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चिमुरडा अखेर सापडला आहे.. पिंपरी चिंचवडजवळच्या पुनावळे गावात स्वर्णवला सोडून अपहरणकर्ता फरार झालाय.. लोट्स बिझनेस स्कूल शेजारी असणाऱ्या इमारतीचे सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्याकडे स्वर्णवला सोपवून अपहरणकर्ता पसार झालाय.. त्याच इमारतीत लिफ्टचं काम करणाऱ्या तानाजी गिरमकर यांनी ही माहिती दिलीय... स्वर्णवच्या बँगेत काही पुस्तकं होती..या पुस्तकांवर त्याच्या वडिलांचा नंबर होता..त्यामुळं स्वर्णवच्या कुटुंबियांशी संपर्क साधणं शक्य झालं..