Pune Illegal Pubs Hotels : पुण्यात 89 बेकायदा रुफटॉप पब्स? धक्कादायक माहिती समोर!

पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला ((Pune Porsche Car Accident) धडक  दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे ही पोर्शे महागडी आलिशान कार मद्यप्राशन करुन सताव वर्षांचा मुलगा चालवत होता. या अपघातानंतर जमावाने सतरा वर्षाच्या मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांकडे दाखल केलं. हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेल्या विशाल अग्रवालचा (Vishal Agraval) मुलगा होता. सतराव्या वर्षी मुलाच्या हाती कोट्यावधी रुपयांची गाडी दिली. या गाडीने दोन निष्पापांचा जीव घेतला. पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक, विशाल अग्रवाल आहेत तरी कोण पाहुयात...

विशाल अग्रवाल नेमके कोण?

-ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत. 
- ब्रम्हा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षांपासून आघाडीवर राहिलंय.
- ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola