Koregaon Bhima | कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनासाठी गर्दी | पुणे | ABP Majha
कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त आज विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे. आजचा कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून भीमसागर याठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच याठिकाणी उपस्थित राहून विजयस्थंभाला अभिवादन केलं आहे. आज अनेक मोठे नेते याठिकाणी येणार आहेत. यामध्ये नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक आमदार, खासदार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.