Pune Bhide Wada : पुण्यातील भिडे वाडा जमीनदोस्त, लवकरच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार

Continues below advertisement

Pune Bhide Wada : पुण्यातील भिडे वाडा जमीनदोस्त, लवकरच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार 

पुणे : मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या (Pune News)  ज्या भिडे वाड्यात (Bhide Wada)  सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने  जमीनदोस्त केला आहे. गेल्याच महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्ट फेटाळून लावली आणि भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे मनपाने  (PMC)  ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला.  मोठ्या पोलिस बंदोबस्तात (Pune Police)  ही मोहिम रातोरात फत्ते केली गेली. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल.

क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram