Pune : स्वर्णव चव्हाण सापडल्यावर भेटीसाठी निघालेल्या स्वर्णवच्या आत्याचा मृत्यू : ABP Majha
पुण्याच्या बाणेरमधून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण घरी सुखरूप परत आल्यानंतर आनंदित झालेल्या चव्हाण कुटंबावर पुन्हा शोककळा पसरली आहे. स्वर्णव सापडल्यामुळे त्याला भेटण्यासाठी नांदेडहून निघालेली त्याची आत्या सुनीता राठोड यांचा अपघाती मृत्यू झालाय. पुण्याजवळ नगर रस्त्यावर त्यांच्या चारचाकी गाडीला अपघात झालाय. याच अपघातात स्वर्णवचे आत्येभाऊ समर आणि अमन राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरातील नागरिकांनी साजरा केला. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.