Pune : whatsapp Group मधून काढून टाकल्याच्या रागात अॅडमिनची जीभ कापली ABP Majha
Continues below advertisement
Pune : whatsapp Group मधून काढून टाकल्याच्या रागात अॅडमिनची जीभ कापली ABP Majha
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे... व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने एका ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण करत त्याची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत या टोळक्याने अॅडमिनची जीभच कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला आहे.
Continues below advertisement