Pune Ambil Odha : स्थानिकांना दिलेल्या नोटिसा नाहीत, तर ते निवेदन आहे : केदार असोसिएट्स
Continues below advertisement
पुणे-आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांवर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. केदार असोसिएट्स बिल्डरच्या लेटरहेडवर आंबिल ओढाच्या रहिवाशांचा नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? असा प्रश्न कारवाई करणाऱ्यांना स्थानिकांच्या वतीनं विचारण्यात येत आहे.
यासंदर्भात बोलताना केदार असोसिएट्सच्या प्रताप निकम यांच्यासोबत एबीपी माझानं संवाद साधला. त्यावेळी बोलताना पुणे-आंबिल ओढा परिसरात कारवाई झालेल्या प्लॉटशेजारी आमचा एसआरए प्रकल्प सुरु आहे. आजची कारवाई आम्ही केलेली नाही, स्थानिकांना दिलेल्या नोटिसा नाहीत, तर ते निवेदन आहे, असं केदार असोसिएट्सच्या प्रताप निकम यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Pune News Ncp Pune Mayor PMC Commissioner BJP Pune Municipal Corporation Pune Ambil Odha Ambil Odha Encroachment Ambil Odha Slum Ambil Odha Flood PMC Action On Ambil Odha Encroachment Kedar Associates Kedar Builder