Puen : आंबेगाव येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवसृष्टी प्रकल्प
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवसृष्टी प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग व घटना आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा परिचय करुन देणारी मांडणी करण्यात येणार आहे. आंबेगावातील 'शिवसृष्टी' प्रकल्पास 50 कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून अनुदान देण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात येतोय... कसा असणार आहे हा प्रकल्प पाहुयात