Pune : पुण्यातील गणेश मंडळांसोबत अजितदादांची बैठक, पण पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी?
पुण्याचे पालकमंत्री पद जरी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसतायत. अजित पवारांची आजही पुण्यात महत्त्वाची बैठक आहे. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत मात्र महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारमधे सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांन पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाका लावलाय. मागील आठवडय़ात अजित पवारांन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त , पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका त्यांनी घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे एकूणच सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादीचा अजित पवार गट चंद्रकांत पाटीलांवर कुरघोडी करता दिसतोय.