Pune Accident Vishal Agarwal Arrested: पुणे अपघात प्रकरण, विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Continues below advertisement

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.  दुपारपर्यंत त्यांना पुण्याला आणले जाणार आहे.  पुण्यात (Pune Porshe Accident News)  प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. अनिस अवधिया आणि  अश्विनी कोस्टा ( रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले.  आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.परंतु हा अपघात इतका भीषण होता  की  अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर मदत करणाऱ्या एक प्रत्यक्षदर्शी  घटनाक्रम सांगितला आहे. 

प्रत्यक्षदर्शी अमन शेख म्हणाला,  मी माझी रिक्षा घेऊन भाड्यासाठी थांबलो होतो. तेव्हा एक पोर्शे कार वेस्टीन जवळून  फुल स्पीडमध्ये आली. तर मृत  दुचाकीस्वार हे यू-टर्न मारुन पुढे चाललले होते. मागून आलेल्य पौर्शे कारने त्यांना मागून येऊन जोरात ठोकले. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवर मागे बसलेली मुलगी अक्षरश:  हवेत उडाली आणि खाली पडली. तर दुचाकीस्वार मुलाच्या संपूर्ण बरगड्या तुटल्या होत्या. मुलगा फूटपाथवर बसला होता. कारच्या सर्व एअर बॅग उघडल्या होत्या. त्यानंतर आम्ही धावत गेलो. गाडीत तीन मुले होती... एक मुलगा पळून गेला तर दोन मुलांना जमावाने मारले. नंतर पोलीस आले आणि त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले.  गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या. गाडीत असणारी दोन्ही मुले दारु प्यायलेले होते.  गाडीचा स्पीड हा 200 ते 240 च्या आसपास होता. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram