Pune Accident : Ajay Taware Shrihari Halnor निलंबित; तर 'ससून'चे डीन Vinayak Kale सक्तीच्या रजेवर
Pune Kalyani Nagar Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Kalyani Nagar Accident) ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणात अखेर राज्य सरकारकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे (Vinayak Kale) यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला.
हसन मुश्रीफ काय काय म्हणाले?
ससून फेरफार प्रकरणात समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल आला. अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मी आधीच सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट आहे त्यावर कारवाई होईल. यापुढे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यात असं प्रकरण त्यांना करता येणार नाही अशा प्रकारचे शिक्षा किंवा कारवाई होईल. त्याप्रमाणे आपण कारवाई केली आहे. संपूर्ण चौकशी होईल त्यांचा सुद्धा मत घेतला जाईल. त्यांना योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. आणि दोघांना निलंबित केले आहे. 26 तारखेला ही घटना मला कळाली. त्याच वेळा मी सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणे ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे. लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. अशाप्रकारे घटना घडतात कामा नये यासाठी मी निर्देश देखील दिले, असं मंत्री हसन मुश्रीफ याबाबत बोलताना म्हणाले.