Pune Cycle Accident : पुण्यात भीषण अपघात, वाहना धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jun 2024 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara News भंडारा : पुणे येथील अल्पवयीन कार चालकाने बेदरकारपणे कार चालवून केलेल्या भीषण अपघाताचे (Pune Accident) प्रकरण सध्या गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भंडारा (Bhandara) पोलीसही सतर्क झाले आहेत. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा वाहतूक शाखेनं अल्पवयीन बाईकस्वारांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान शहरातून भरधाव बाईक चालवणाऱ्या सात अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांच्या पालकांवर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आता सातत्यानं करण्यात येणार असून पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देवू नये, असं आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे.