Pune:पुण्यातील 500 कोटींची जागा 60 कोटींमध्ये बिल्डरला देण्याचा डाव,सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध

Continues below advertisement

Pune:पुण्यातील 500 कोटींची जागा 60 कोटींमध्ये बिल्डरला देण्याचा डाव,सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या समोर असलेली आणि कर्करोगाच्या रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेली सार्वजनीक बांधकाम विभागाच्या मालकीची पाचशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीची सव्वा दोन एकर जागा अवघ्या साठ कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः याला विरोध केला असून जागेच्या बदल्यात मिळणार असलेले साठ कोटी रुपये स्वतः देण्याची तयारी दर्शवलीय. विशेष म्हणजे याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं आहेत. एका कार्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं स्मारक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही सव्वा दोन एकर जागा २६ वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाला भाडेतत्वार देण्यात आली होती. पण ही जागा एन जी व्हेंचर्स या खाजगी बिल्डरला द्यायचं रस्ते विकास महामंडळानं ठरवलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram