Pune Auto Protest : पुण्यात रिक्षा बंद ठेवून आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच!

Continues below advertisement

पुण्यातल्या बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सी वाहतुकीविरोधात रिक्षाचालकांनी सोमवारी पुन्हा संप करून, राज्य सरकारविरोधात निषेध नोंदवला. त्यामुळं पुण्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.  पुण्यातल्या रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून, आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात १० संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळं आरटीओ चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. याआधी पुण्यातल्या रिक्षाचालकांनी २८ नोव्हेंबरला संप केला होता. रॅपिडो कंपनी पुण्यात बाईक टॅक्सी बंद करत  नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram