Pune Rajbhavan NCP Protest : पुण्यात राजभवनाबाहेर NCPकडून आंदोलन, राज्यपालांना दाखवले काळे झेंडे

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलल्या वक्तव्याचा वाद काही शमताना दिसत नाहीये... आज पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला... आज पुण्यातील यशदामध्ये राज्यपालांचा कार्यक्रम होता... राज्यपालांचा ताफा ज्या रस्त्यानं जाणार होता. तिथे स्वराज्य संघटनेनं राज्यपालांना काळे झेंडे दाखवले... तर पुण्याच्या राजभवनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आंदोलन केलं... कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत राज्यपालांना इथेही काळे झेंडे दाखवले....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola