पुणेरी पाट्यांमधून वाहतूक पोलीस कारवाईचा निषेध, कारवाई केल्यानं दुचाकीचं स्मारक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
15 Sep 2021 04:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील कोथरुड भागात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत ती दुचाकी उचलली आणि पोलीस चौकीला नेली. पण यामुळे ही दुचाकी ज्यांच्या मालकीची होती त्या सचिन धनकुडे यांच्यामधला पुणेककर जागा झाला आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद पुढे इतका वाढला की वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी सचिन धनकुडेंनी कोथरुडच्या एका चौकात त्यांच्या दुचाकीचे स्मारक उभा केलय. या स्मारकावर त्यांनी वाहतूक पोलीसांच्या जाचाचा पाढा वाढणार्या पाट्या लावल्यात. एवढच नाही तर या स्मारकावर त्यांनी आणखी एक दुचाकी आणून ठेवली आहे.