Pune : Narendra Modi : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर
Pune : Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरात ते मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. तसचं पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याआधीही नरेंद्र मोदीचा पुणे दौरा नियोजित होता, परंतु काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.