Pune Porsche Car Accident : पोर्शे पॅनामेरा कारची दुचाकीला धडक; 2 आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू

Continues below advertisement

पुण्यात काल रात्री पोर्शे पॅनामेरा या स्पोर्ट्स कारनं दुचाकीला धडक दिली, यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी कार चालक वेदांत अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. 
या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेदांतला जमावानं चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. विशेष म्हणजे वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या पोर्शे कारला नंबर प्लेटच नव्हती. या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही पुण्यातील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. या अपघातानंतर पुण्यातील पब आणि बारना रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. ((त्याचबरोबर पोर्शे सारखी महागडी कार पुण्याच्या रस्त्यांवर नंबर प्लेट शिवाय कशी धावू शकते हा प्रश्नह विचारला जातोय))

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram