Pooja Khedkar : पूजा खेडकरची प्रचंड बनवाबनवी; दिव्यांग कोट्याचा घेतला लाभ?

Continues below advertisement

Pooja Khedkar : पूजा खेडकरची प्रचंड बनवाबनवी; दिव्यांग कोट्याचा घेतला लाभ? पूजा खेडकर यांना 2022 मध्ये  युपीएससी परीक्षेत 821 वी रँक मिळाली. या रँकसह त्यांना आयएएस (IAS) दर्जा मिळणं शक्य नव्हतं, कारण त्यावर्षी ओबीसी कॅटेगरीतून आयएएस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक 434 होती. म्हणजे या विद्यार्थ्यांपेक्षा पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची रँक दुपटीने मागे असूनही त्या आयएएस झाल्या. कारण त्यांनी मल्टिपल डिसायबलिटीज असल्याचा दावा केला होता. मात्र त्याआधी 2019 ला युपीएससीची परीक्षा देताना असा कुठलाही दावा केला नव्हता. विशेष म्हणजे 'कॅट'ने त्यांचा हा दावा फेटाळल्यावरही पूजा खेडकर यांची आयएएससाठी निवड झाली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांचं स्वतःच उत्पन्न 42 लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे 40 कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या? हा प्रश्न विचारला जातोय.  खेडकर कुटुंबाच्या राजकीय लाग्याबांध्यांमध्ये या प्रश्नांची उत्तरं दडली असण्याची शक्यता आहे.    पूजा खेडकर या आयएएस कशा बनल्या याबाबतचं गूढ वाढत चाललंय .  2019 ला सर्वसाधारण उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या पूजा खेडेकर युपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण तर झाल्या मात्र त्यांना कमी मार्क्स असल्यामुळं आयएएस चा दर्जा मिळू शकला नाही. मग 2022 ला पूजा यांनी त्यासाठी शक्कल लढवायचं ठरवलं. आपण फिजिकली डिसेबल म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत असा दावा करत तस सर्टिफिकेट युपीएससी ला सादर केलं.दी पर्सन विथ बेंच मार्क डिसेंबलीटीज हा एक वेगळी कॅटेगरी  यु पी एस सी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये शारीरिक अपंगत्व किती प्रमाणात आहे. यावरून 1, 2, 3, 4, आणि 5 असे प्रकार ठरवण्यात आलेत. पूजा खेडकर यांनी यातील सर्वात खालची म्हणजे टाईप पाचची डिसेबलीटी असल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं. यामुळं यु पी एस सी परीक्षेत 821 क्रमांकाची रँक मिळूनही त्यांना आय ए एस चा दर्जा मिळाला. त्यावर्षी यु पी एस सी च्या यादीत ओ बी सी कॅटेगरीतून आय ए एस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक होती 434 . म्हणजे जवळपास दुपटीने मागे असूनही पूजा खेडकर आय ए एस बनण्यात यशस्वी झाल्या, त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram