Pooja Khedkar Case : पूजा खेडकरच्या कुटुंबीयांनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कपनीचा थकीत कर भरला
Pooja Khedkar Case : पूजा खेडकरच्या कुटुंबीयांनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कपनीचा थकीत कर भरला बडतर्फ ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या कंपनीचा पत्ता वापरला, त्या थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा थकीत कर अखेर खेडकर कुटुंबीयांनी अदा केलाय. कंपनी सील केल्यानंतर एकवीस दिवसांत कर अदा न केल्यास मालमत्तेचा लिलाव केला जातो. या भीती पोटी खेडकर कुटुंबीयांनी ही तत्परता दाखवली आणि रोख रकमेच्या रुपात पिंपरी पालिकेचा थकलेला कर अखेर अदा केला. गेल्या तीन वर्षांचा दोन लाख 87 हजार 591 रुपयांचा मालमत्ता कर तर एक लाख 78 हजार 680 रुपयांची पाणी पट्टी रोख स्वरूपात भरली आणि खेडकर कुटुंबीयांनी किमान कंपनीच्या लिलावाची कारवाई तरी रोखली.
हेही वाचा :
मार्मिकचा आज ६४ वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंची उपस्थिती, मनसेशी पेटलेल्या वादावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद, आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पीकपाण्यासह लाडकी बहीण योजनेचा घेणार आढावा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली बैठक, विधानसभा निवडणूक, एससी-एसटी आरक्षणात क्रिमिलेअरसह जातगणनेच्या मुद्द्यावर होणार चर्चा
भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची आज बैठक, मुंबईतील जागांबाबत होणार चर्चा, आशिष शेलारांसह सर्व सदस्य राहणार उपस्थित
कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून
कामबंद आंदोलन, अत्यावश्यक सेवा राहणार सुरु
ओटीटी आणि डिजिटल मीडियाला कायद्याच्या कक्षेत आणणाऱ्या वादग्रस्त प्रसारण सेवा विधेयकाचा मसुदा मागे, सर्वसहमतीने तयार होणार सुधारित मसुदा
विनेश फोगटच्या याचिकेवर आज क्रीडा लवाद देणार निर्णय, संयुक्त रौप्यपदकाची विनेश मागणी मंजूर होणार का याची उत्सुकता
कांदा, हळदीनंतर आता संत्र्यालाही बांगलादेशमधील अराजकतेचा फटका, बांगलादेशला जाणारी अडीच लाख टन संत्री अडकली, उत्पादक चिंतेत